yuva MAharashtra फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा संगीतमय जागर

फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा संगीतमय जागर

सांगली टाईम्स
By -


कोल्हापुरात आयोजन; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार 

कोल्हापूर / प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील पारंपरीक संस्कृतीची ओळख व थोर महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार नवीन पिढीपर्यंत पोहचावेत  या उद्देशाने मा.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे, मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनत्मक विचाराचा जागर असणारा फुले शाहू आंबेडकरी जलसा  आयोजित करण्यात येत आहे. 

दिनांक ५ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तीन दिवसीय  संगीतमय कार्यक्रमाचे कोल्हापूर शहरातील  देवल क्लब च्या  गोविंदराव टेंबे सभागृहात  आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शाहीर आझाद नायकवडी, नागसेन सावदेकर,  वैभवी कदम, गणेश चंदनशिवे व सहकालाकार  यांचे प्रबोधनपर गीतगायन सादर होईल.

ADVT.

दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी शाहीर हेमंतराजे मावळे,प्रवीण डोणे, रागिणी बोदडे, रामलिंग जाधव व सहकलाकर यांचे सादरीकरण होईल.तर दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी शाहीर राजा कांबळे, अभिजित कोसंबी, प्रसेंजित कोसंबी व सहकलाकार आपले सादरीकरण करतील. कोल्हापूर येथे  होऊ घातलेल्या या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकाराचा किंबहुना या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन  श्री. बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य  यांनी केले आहे.

Tags: