![]() |
| सुवर्णकन्या अन्विता सूरज सावंत |
सांगली / प्रतिनिधी
मापसा (गोवा) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत अन्विता सूरज सावंत हिने सुवर्णपदक पटकावत सांगलीच्या क्रीडा विश्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शोक्तोकान कराटे असोसिएशन व खेलो इंडिया, महाराष्ट्र असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मापसा (गोवा) येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अन्विता सूरज सावंत ही किड्स पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता २ री मध्ये शिकते. नीता मोरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
![]() |
| ADVT. |

