![]() |
| राज्यभरातील शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी सेनेच्या जिल्हाप्रमुख यांच्यासह प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे. |
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे; लवकरच शिव प्रेरणा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
मुंबई / प्रतिनिधी
शिवसेना ओबीसी, भटक्या विमुक्त जाती, जमाती, बारा बलुतेदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर असून येणाऱ्या काळात समस्त ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येतील, असा ठाम विश्वास शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) बाळासाहेब किसवे यांनी व्यक्त केला. दरम्यान येत्या १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी अखेर जेजुरी मध्ये तीन दिवसांचे कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असेही किसवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख यांची दि. २ फेब्रुवारी रोजी मुंबई येथिल शिवसेना बाळासाहेब भवन येथे राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना किसवे म्हणाले, शोषित, उपेक्षित, दूर्लक्षित वंचित भटक्या विमुक्त जाती जमातीतील बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर राहीन.
![]() |
| ADVT. |
कार्यक्रमास शिवसेना 'ओबीसी व्हिजेएनटी' चे महाराष्ट्र राज्य समन्वयक मारुती जानकर , विठ्ठल भाऊ मारनर, राजेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा चे नियोजन शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी चे सोशल मिडिया प्रमुख तथा महाराष्ट्र निवड समिती सदस्य संजय कुसळकर, महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्य तथा नांदेड जिल्हाप्रमूख अनिल पाटील धमने, महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्य तथा पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे यांनी नियोजन केले.
बैठकीस कपिल रोडे (ठाणे), विक्रम चव्हाण (सांगली), सूयश कर्चे (सोलापूर), कमलाकर दाणे (धाराशिव), राजेंद्र पाटील (जळगाव), संतोष राठोड, राहुल जाधव (छत्रपती संभाजीनगर), विशाल देवकत्ते (लातूर), संतोष बारगजे (बीड), नाशिक डॉ. कल्पेश शिंदे (नाशिक), हेमंत भोईटे (सातारा), मयूर मोहिते (कोल्हापूर), विशाल सरगर, डॉ राजकुमार वाघमोडे (मुंबई), डॉ. भरतेश्वर कस्तुरे, अनिल राठोड, ॲड किशोर राठोड (यवतमाळ), मदन रेनगडे (परभणी), डॉ. मेघश्याम करडे (अमरावती), प्रकाश बोबडे (अमरावती), रामेश्वर लांडे (वर्धा), प्रदिपराज बोंडे (अहील्यानगर), सुरेश झोरे (सिंधुदुर्ग), प्रभू शेट्टे, राम पाटील खरात, पंढरीनाथ जायनूरे, आनंद श्रीरामे, धुळे शहराध्यक्ष भटु भोपे, उमरगा तालुकाध्यक्ष गोपाल घोडके आदीं सह अनेक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

