माजी आमदार नितीन शिंदे ; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी
सांगली / प्रतिनिधी
राज्यात ज्वलंत हिंदुत्ववादी सरकार आहे. गड, किल्ल्यावरील अतिक्रमणे काढली जात आहेत. त्याच धर्तीवर मशिदीवरील अनधिकृत भोंगे ही उतरवावा. महाराष्ट्र भोंगे मुक्त करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमबजावणी करा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.
श्री. शिंदे यांच्या नेतृत्वात हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कर्यालायासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सांगली शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मशिदीवर भोंग्यांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत भोंगे आहेत. दिवसातून अनेक वेळा कर्णकर्कश आवजामुळे विद्यार्थी, वृध्द, रुग्णांना त्रास होतो. उच्च न्यायालयाने यापूर्वीच अनधिकृत भोंगे उतरविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदू एकता आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकरे, अविनाश मोहिते,विष्णू पाटील, परशुराम चोरगे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रदिप निकम, नारायण हांडे, मनोज साळुंखे अरुण वाघमोडे विनायक शेळके राम काळे संभाजी पाटील राजोबा चौगुले यश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
