![]() |
| मिरज : मिरज सुधार समितीच्या कार्यालयाचे भूमिपूजन करताना खासदार विशाल पाटील. बाजूस आमदार इद्रीस नायकवडी व अन्य. |
■ घरपट्टी वाढ करावी लागणार नाही..
■ खासदार विशाल पाटील यांची महापालिकेला कानपिचक्या
■ मिरज सुधार समिती कार्यालयाचे भूमीपूजन संपन्न
मिरज / प्रतिनिधी
महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च याचा योग्य बताळमेळ घातल्यास महापालिकेला घरपट्टी सारख्या जनतेचे रोष ओढवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत असे कानपिचक्या खासदार विशाल पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार इद्रिस नायकवडी होते.
यावेळी खासदार पाटील म्हणाले,महापालिका घरपट्टी वाढ करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केला आहे त्या व्यवस्थितरित्या मिळतात का? याचे अभ्यास होणे आवश्यक आहे. सुविधा नसेल तर नागरिकांचा विरोध साहजिकच आहे. आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, नागरीक प्रश्नांची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाथी लोकप्रतिनिधी बरोबरच मिरज सुधार समिती सारख्या बाह्य शक्तीचा सहभाग आवश्यक असतो. म्हणून सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत.
यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संगीता खोत, विजय धुळूबुळू, किशोर जामदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन व्हनखंडे, भाजप जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, निरंजन आवटी, संजय मेंढे, डॉ. रियाज मुजावर, किशोर पटवर्धन, तानाजी सातपुते, कासीम मणेर, महादेव कोरे, महादेव दबडे, सौ. राधिका हारगे, ऍड. इर्शाद पालेगार, डॉ. हेमराज सातपुते, डॉ. सलीम चमनशेख, रवी अटक, राकेश कोळेकर, श्वेत कांबळे, धनराज सातपुते, अशोकसिंह रजपूत, सज्जाद भोकरे, अकबर मोमीन, किरण बंडगर, नितीन सोनवणे, राजेंद्र नागरगोजे, महेश चौगुले, शब्बीर शेख, उमेश हारगे, अजमोद्दीन खतीब, राजू कांबळे, सचिन जाधव, प्रा. मिलींद गुरव, असगर शरीकमसलत, म.हनिफ ताशीलदार, अनिकेत गायकवाड, सौ. शाकेरा जमादार, समीर कुपवाडे, कय्युम नदाफ, नय्युम नदाफ, बाळासाहेब तामगावे, मुन्ना नायकवडी, सुलेमान मुजावर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यासह मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
