yuva MAharashtra अनैतिक संबंध; सेंट्रींग कामगाराचा निर्घृण खून

अनैतिक संबंध; सेंट्रींग कामगाराचा निर्घृण खून

सांगली टाईम्स
By -

 

मृत दत्ता सुतार 

तिघे अल्पवयीन ताब्यात; चेहऱ्यावर कोयत्याने  वार

सांगली / प्रतिनिधी 

सांगलीवाडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रींग कामगाराचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. भरदिवसा झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.  दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, शिवशंभो चौक, मूळ रा. इंदिरानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, अनैतिक संबंधातून दत्ताचा काटा काढण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासाध्ये समोर आले आहे. 

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून कोयता, चाकू जप्त करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दत्ता सुतार हा सेंट्रींग कामगार आहे. तो यापुर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता. त्यांच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही रहात होता. आज सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले. दुपारी बाराच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार व त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) वरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेला.

दत्ता याचे संशयित मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेच्याच घरात राहण्यास होता. त्या महिलेस किरकोळ कारणातून वाद घालत मारहाणही करत होता. हे संशयित मुलगा नेहमी पहायचा त्यातून त्याचा राघ उफाळत गेला. यापुर्वी देखील भांडण झाले होते. दत्ताचा काटा काढण्याचा कट यापुर्वीही रचण्यात आला होता. परंतू संशयितांने आज त्याला निर्जनस्थळी गाठत खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी होते. अनैतिक संबंधाचा राग पुर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. दत्ता दुचाकीवरून त्याठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने छातीवर दगड मारला. त्यावेळी दत्ता जमिनीवर कोसळला. त्यानंतर चिडलेल्या मुलाने हतातील कोयत्याने सपासप वार केले. दत्तावर हल्ला होताच त्याचा मित्र ठोंबरे हा तेथून पळून गेला. अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागी मृत्यू झाला. पोलिस उपाधीक्षक विमला एम., शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी होते. तासाच्या आत संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. 


Tags: