डझनचा दर ५ हजार ५०० रुपये
सांगली / प्रतिनिधी
फळांचा राजा अर्थात आंबा सांगलीत दाखल झाला आहे. येथील विष्णूआण्णा पाटील फळ मार्केटमध्ये चंद्रभान शर्मा अँड सन्स मध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेटी आंब्याची आवक झाली आहे. एक डझन आंब्याला ५ हजार ५०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.
आंबा म्हंटले की साहजीकच तोंडाला पाणी सुटते. जानेवारी संपला की आंब्याची चाहूल लागते. आंबा कधी बाजारात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. अखेर ती प्रतीक्षा संपलेली आहे.
येथील विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये चंद्रभान शर्मा अँड सन्स मध्ये देवगड आणि कुणकेश्वर येथून पंचवीस पेटीची आंब्याची आवक झाली आहे. तर एक डझन पेटीला पाच हजार पाचशे रुपये इतका उचक्की भाव मिळाला आहे. आंबा हा फळ फळांचा राजा म्हणून ओळखला जातो.
