yuva MAharashtra काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल

काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल

सांगली टाईम्स
By -
सातारा जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वास

सातारा / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने खचून न जाता ताकदीने काँग्रेस कार्यकर्त्याने पक्ष संघटनेचे तसेच जनसेवेचे काम करणे गरजेचे आहे. काँग्रेसने लोकशाहीचा विचार व शाश्वत विकास कायम जपला आहे व यामार्गाने नक्कीच काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

चव्हाण यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्षांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने खचून न जाता ताकदीने काँग्रेस कार्यकर्त्याने पक्ष संघटनेचे तसेच जनसेवेचे काम करणे गरजेचे आहे. काँग्रेसने निवडणूक ही लोकशाही च्या मार्गानेच कायम लढली आहे कधीही रडीचा डाव खेळला नाही, अनेक वर्षे सत्तेत असूनही कधीही यंत्रणाचा गैरवापर केला नाही, विरोधी पक्ष टिकला पाहिजे हीच भावना कायम ठेवली. 

ADVT.

जय पराजय हा निसर्ग नियम आहे तो कोणत्या मार्गाने केला गेला यामध्ये न गुंतता स्वीकार करून काँग्रेस कार्यकर्ता कायम पुढे चालत राहिला आहे. काँग्रेसने याआधी अनेक जय पराजय बघितले आहेत त्यातून मार्ग काढत आजही पक्ष देशातील प्रत्येक गावागावात टिकून आहे. स्वातंत्र्य प्राप्ती वेळी व त्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने देशाच्या हितासाठी, विकासासाठी केलेले काम आजही शाश्वत आहे.

 यामुळेच काँग्रेस अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. काँग्रेसने लोकशाहीचा विचार व शाश्वत विकास कायम जपला आहे व यामार्गाने नक्कीच काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. 

Tags: