yuva MAharashtra 'कोरोना', 'महापूर' खर्चाचे काटेकोरपणे ऑडिट व्हावे

'कोरोना', 'महापूर' खर्चाचे काटेकोरपणे ऑडिट व्हावे

सांगली टाईम्स
By -

आरती वळवडे : लेखापरीक्षण सहसंचालकांना निवेदन

सांगली : प्रतिनिधी

महानगरपालिकेचे सन २०१८ ते २०२१ आर्थिक वर्षातील अभिलेखांचे लेखापरीक्षण सुरू झाले आहे. या कालावधीत कोरोना प्रतिबंध व उपचार उपाययोजना तसेच महापूर कालावधीत झालेल्या खर्चाचे काटेकोर लेखापरीक्षण करून अहवाल सादर करावा. दोषींवर वसुली लावावी, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी स्थानिक निधी लेखापरीक्षणच्या राज्य सहसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापूर व कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत लोकायुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दुसरी तारीखसुद्धा झाली आहे. महापालिकेकडून जो अहवाल सादर झाला होता, त्यामध्ये जो खर्च दाखविला आहे, तो चुकीचा असल्याचे लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अहवालामध्ये फक्त महापूर काळातील खर्च सादर केला आहे. कोरोना काळातील एकही कागद सादर केला नाही. हे निदर्शनास आणून दिल्याने सुनावणीची नवीन तारीख दिली आहे. कोरोनासंदर्भातील खर्चाची सर्व कागदपत्रे हजर करा, असे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत.
ADVT.

महानगरपालिकेचे सन २०१८ ते २०२१ अर्थिक वर्षातील अभिलेखाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहायक संचालक तथा पथक प्रमुख विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लेखापरीक्षण सुरू केले आहे. कोरोना व महापूर कालावधीतील खर्चाचे लेखापरीक्षण काटेकोरपणे करून शासनाला अहवाल सादर करावा. आर्थिक जबाबदारी निश्चित करून दोषींकडून वसुली करावी, अशी मागणी वळवडे यांनी केली आहे.
Tags: