![]() |
| श्रमसंस्कार शिबीर प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य एम. के. पाटील. |
प्राचार्य एम. के. पाटील ; लंगरपेठ मध्ये श्रामसंस्कार शिबीर
कवठेमहंकाळ / प्रतिनिधी
लंगरपेठ (ता.कवठेमहंकाळ) येथे पी. व्ही. पी. महाविध्यालय कवठेमहंकाळ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कवठेमहंकाळ यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन १० ते १६ फेब्रुवारीपर्यंत सुरु होणाऱ्या शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. के. पाटील म्हणाले श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळते. "युवकांचा ध्यास व शास्वत कृषी विकास " या उद्देशाने ग्रामपंचायत लंगरपेठ यांच्या सौजन्याने साप्ताहिक शिबीर आयोजन करण्यात आले.यामध्ये जलसंधारण,बंधारा तयार करणे, पाणी आडवा पाणी जिरवा, आरोग्य प्रबोधन,वृक्षारोपन,पर्यावरणव्यसमुक्ती, श्रमदान ,ग्रामस्वच्छता असे विविध उपक्रमाद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे.
प्रा. एन. एस. पोळ यानी या शिबीर आयोजाबाबत उद्देश सांगीतला. यावेळी बाजार समितीचे सभापती महेश पवार,केंद्रप्रमुख विशाल शिंदे, सरपंच अंजना कांबळे, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी एस. एस. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. स्वागत मोहितेसर यानी केले तर प्रा. एस. ए. बाबर यांनी आभार मानले.
