भाजपा माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे बेताल वक्तव्य
सांगली / प्रतिनिधी
सातत्याने बेताल वक्तव्य करणारे माजी खासदार रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपाच्या संघटन पर्व कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांना उद्देशून पुन्हा एकदा चाकोरी बाहेरील वक्तव्य केले आहे. भाजपचे कार्यकर्ते इतके आहेत की ते थुंकले तर विरोधक वाहून जातील असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि वादग्रस्त वक्तव्य हे नवे समीकरणच निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्री असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल"कितीही दिले तरी रडतात साले" असे म्हणत अकलेचे तारे तोडले होते. त्याच्या या वक्तव्याने त्यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला आहे. त्यांच्या पराभवाच्या अनेक करणापैकी बेताल वक्तव्य हे एक प्रमुख कारण आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत झटका बसूनही दानवे यांच्या स्वभावात फरक पडल्याचे दिसून येत नही. भाजपाच्या संघटन पर्व कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांची संख्या इतकी आहे की ते थुंकले तरी विरोधक वाहून जातील असे घाणेरडे वक्तव्य करून दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
