![]() |
| जत : करजगी येथील पीडित चिमुरडीच्या कुटुंबाची विचारपूस करताना मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे महासचिव सुफीयान पठाण. |
करजगी चिमुरडी अत्याचार, खून प्रकरण; मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना तपास अधिकाऱ्यांची ग्वाही
सांगली / प्रतिनिधी
करजगी (ता. जत) येथील चिमुरडीवर अत्याचार व खून घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तपासात कोणतीही कसूर राहणार नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १२ दिवसात आरोपीविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करू अशी ग्वाही तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिल्याची माहिती मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे महासचिव सुफीयान पठाण उपस्थित होते.
मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी करजगी (ता. जत) येथील अत्याचार व खून घटनेतील चिमुरडीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांना दिलासा दिला. याशिवाय तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या संशयित आरोपी पांडुरंग कळळी याच्यावर कठोर कारवाई करावी. गतीने तपास करून त्याला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
![]() |
| ADVT. |
दरम्यान घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. येत्या १२ दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल करण्यात येईल. घटना घडल्यानंतर इतक्या कमी दिवसांत चार्जशीट न्यायालयात दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांचेसह अन्य पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ तसेच धावडवाडीचे मौलाना साबीर, इम्रान बेग, सामीन पठाण, जतचे मौलाना आसिफ, अफजल मोमिन उपस्थित होते.

