yuva MAharashtra करजगी अत्याचार, खून प्रकरणी नराधमाला फाशी द्या

करजगी अत्याचार, खून प्रकरणी नराधमाला फाशी द्या

सांगली टाईम्स
By -
करजगी अत्याचार, खून प्रकरणी नराधमला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक सोम वाघ यांना देताना तासगाव येथील समस्त मुस्लिम समाज बांधव.

तासगाव / प्रतिनिधी

करजगी ( ता. जत ) येथील चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची  हत्या करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा करा अशी मागणी तासगाव येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, करजगी येथील घटना माणुसकीला काळीबा फासणारी आहे.अशा प्रकारच्या राक्षशी प्रवृत्ती कायद्याने वेळीच ठेचने आवश्यक आहे.यासाठी कलकत्ता येथील "आर जी कर प्रकरण" मधील पोलिसांनी घेतलेल्या तत्पर कारवाई नुसार ५९ दिवसात सदर प्रकरणी न्यायालयात केस चालवून आरोपीस शिक्षा झाली.

त्याच धर्तीवर आपल्याकडून जत येथे घडलेल्या मानवीय गुन्ह्यास पोस्को कायद्याच्या सुधारित तरतुदी नुसार आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या करिता सदर गुन्ह्याची चार्ज शीट तयार करून लवकरात लवकर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा मिळवुम पीडित बालिका व तिच्या कुटूंबियांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी हाफीस इसाक बारस्कार , निसार मुल्ला, जैद मेहतर, अब्दुल बारस्कर, अशपाक  मुल्ला, उकबा मोमीन, आझाद मुजावर, अय्यान बेंद्रे, शोएब मोमीन व अन्य जन उपस्थित होते.