
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देताना प्रदीप कांबळे.
भाजपा अनुसुचित मोर्चाचे प्रदीप कांबळे यांची पालकमंत्र्याकडे मागणी
सांगली / प्रतिनिधी
सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी भाजपाच्या अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. श्री. कांबळे यांनी सांगलीत श्री. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की,
बिसुर, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, नावरसवाडी, कर्नाळ, पद्माळ, बुधगाव, माधवनगर, मौजे डिग्रज या भागात राहणारी शेतकरी कुटुंबातील राहणारी मुले व शेतमुजरी करणाऱ्यााची मुले त्यांच्या माध्यमिक व उम्र माध्यमिक शिक्षणासाठी सांगली, मिरज व अन्य ठिकाणी जावे लागते, कारण या गावांच्या जवळ विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील मुले हे शेतातील वाडी, वस्तीवर राहण्यासाठी असतात त्यामुळे त्यांना शिक्षण संस्था मध्ये जाण्यासाठी प्रवासी वाहनांची सोय वेळेत उपलब्ध होत नाही.
तसेच ऊन, वारा, पाऊस अशा वेळेस त्यांना शैक्षणिक संस्थामध्ये जाण्यासाठी खुप अडचणी निर्माण होतात. बिसुर, खोतवाडी, वाजेगाव नांद्रे. नावरसवाडी, कर्नाळ, पद्माळ, बुधगाव, माधवनगर, मौजे डिग्रज या भागातील विद्यार्थ्यांची संख्या हि खुप जास्त आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील मुलाच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व भविष्याच्या विचार करून सोईनुसार सर्व गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी शासनस्तरावर आपल्या कडून उच्च माध्यमिक महाविद्यालय सुरु करण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणीही केली आहे.