![]() |
| येथील जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुण दर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरुडकर). |
माजी आमदार बाबसाहेब पाटील (सरुडकर); जुगाई हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला, गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात
शाहूवाडी / प्रतिनिधी
भारत महासत्ता होण्याची चर्चा होत असताना शिक्षण धोरणामध्ये होणाऱ्या नव्या बदलांचा स्वीकार, मातृभाषेवर प्रेम, इंग्रजी भाषा अवगत करत विद्यार्थ्यांनी संस्कारांचा विसर पडू देऊ नये. जगातील विद्वानांची आत्मचरित्र वाचून भारत देश समजून घ्यावा. यासाठी आई वडील शिक्षकांनी संस्कारक्षम नवी पिढी घडवावी असे आवाहन माजी आमदार बाबसाहेब पाटील (सरुडकर) यांनी केले.
येथील जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुण दर्शन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो घेतो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशातील सर्वसामान्य माणसाला चांगली पदे मिळाली. शिक्षणामुळे माणसाचा विकास झाला. स्त्री शिक्षणाने देशात क्रांती घडवून आणली. देशातील विविध पदे महिला भूषवताना दिसत आहेत. प्रत्येकाने थोरांच्या विचारांचे पारायणे करावीत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत. त्यांच्या विचारवरती श्रद्धा ठेवून वर्तन करावे. देशातील महान महापुरुषांचे विचार तरुणांनी वाचावेत. आचरणात आणावेत तरच देश महासत्ता होईल. जगावरती राज्य करेल. यावेळी गोकुळच्या माजी संचालिका सौ. अनुराधा (ताई) पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. प्रीतम युवराज पाटील (वहिनी), प्रा. प्रकाश नाईक, येळवण जुगाईचे सरपंच सत्यवान खेतल, राजाराम चव्हाण, विश्वास गुरव, अनिल भोसले, रघुनाथ वायकूळ, माजी सरपंच दशरथ घुरके, धोंडीबा कुडाळकर, माजी सैनिक सतीश वायकूळ, मुख्याध्यापिका सौ. साखरे, एस. टी. लष्कर (सर), नितिन पांचाळ यांचेसह परिसरातील बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

