घाबरु नका, काळजी घ्या; लक्षणे आढळल्यास उपचार घ्या
सांगली/ प्रतिनिधी
चीनमध्ये आढळलेल्या मेटान्यूमो (HPMV) व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका अलर्ट झाली आहे. महापालिकेच्या ३० नागरी प्राथमिक केंद्रामध्ये आवश्यक ते औषधोपचार केले जाणार आहेत. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने मनपा आरोग्य केंद्रामध्ये जात उपचार करून घ्यावेत. घाबरु करू नये, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.
मेटान्यूमोचा एकही रुग्ण महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. हा आजार श्वसन मार्गाला होणार आजाराचा प्रकार असुन, यामध्ये श्वसन भागातील वरच्या भागाला संसर्ग होतो. हा एक हंगामी रोग असून सामान्यता हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. फ्ल्यू आणि आरएसव्ही आजारासारखी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तातडीने मनपा आरोग्य केंद्रात जावे. उपचार घ्यावेत.
हे करा :-
१. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येतअसतील तेव्हा आपले तोडावर आणि नाकावर रुमाल किंवा टिशू पेपर ठेवून ते झाकावे.
२. साबण आणि पाणी, अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारोवार स्वच्छ धुवावेत.
३. ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे.
४. पाणी भरपूर प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा.
५. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी काळजी घ्यावी.
६. वायुजन (व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्यावी.
हे करू नये :-
१ हस्तांदोलन करू नये.
२. टिशू पेपर किंवा रुमाल याचा पुनर्वापर करू नये.
३. आजारी लोकांशी संपर्क टाळावा.
४. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.
५. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये.
६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.
