yuva MAharashtra शक्तीपीठ विरोधात आमदार गाडगीळ मैदानात

शक्तीपीठ विरोधात आमदार गाडगीळ मैदानात

सांगली टाईम्स
By -
शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी झालेले सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर गाडगीळ.

 शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभाग; महामार्ग रद्द करण्याची मागणी

सांगली / प्रतिनिधी

बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ शुक्रवारी मैदानात उतरले. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू. बैठक घेत सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही यावेळी आमदार गाडगीळ यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिली.

दरम्यान हा महामार्ग तातडीने रद्द करावा अशी आग्रही मागणी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. खासदार विशाल पाटील, तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पाटील यांनीही आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत पाठिंबा दर्शविला. 

या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भुषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील , गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील,  विलास थोरात, प्रशांत पाटील आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Tags: