सुजित काटे ; झोपडपट्टी पुनर्वसन समिती आक्रमक
सांगली / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यामधील घरांचे मोजमाप, लेआऊट तातडीने करावेत. त्यांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत. यासाठी समिती नियुक्त केली आहे पण कार्यालय नाही. त्यामुळे मोजमाप, लेआऊटचे काम रखडले आहे, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार २७ जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी दिला आहे.bयावेळी उपाध्यक्ष रविंद्र सदामते, संघटन प्रमुख सुरज (मामा) पवार, कार्याध्याक्ष श्रीराम सासणे आदी उपस्थित होते.
काटे म्हणाले, महापालिका प्रशासन झोपडपट्टीधारकांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही. झोपडपट्ट्यांचे मोजमाप, लेआऊट बाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली. प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळकाढू भूमिका घेतली. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी पत्रे प्रशासनाने दिली. मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शासन निर्णय २००२ प्रमाने मनपाने झोपडपट्टी धारकांच्या ते राहत असलेल्या जागांचे मालकी हक्क नोंद होनेसाठी समिती स्थापन केली आहे त्या समितीचे स्वतंत्र कार्यालय चालु करावे. या कार्यालयात स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सबंधित अधिकाऱ्याला झोपडपट्टी धारकांच्या जागांच्या मोजमाप व ले आउट व मालकी हक्क नोंद होने संदर्भात सर्व निर्णयांचे अधिकार असावेत.
कार्यालयात झोपडपट्टी धारकांच्या जागांचा मोजमापे व ले आउट तयार करण्यासाठी व ईतर कामकाजासाठी शाखाअभियंता व इतर कर्मचारी नियुक्त करावेत. मनपा क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी धारकांच्या जागांचे मोजमापे व ले आउट एक महिण्यात पुर्ण करावेत. संजयनगर पत्र्याचीचाळ चिंतामणिनगर झोपडपट्टी भीमनगर झोपडपट्टी व जळीत वसाहत झोपडपट्टी यांचे मोजमापे व ले आउट तयार असुन गेल्या सात महिण्यापासु पुणे सहाय्यक संचालकसो यांच्याकडे अंतीम मंजुरीसठी पाठविण्याचे थांबले आहे ते तात्काळ पाठवावेत आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार पासून आमरण उपोषण करणार असल्याचे काटे यांनी सांगितले.
