![]() |
| श्री. राज ठाकरे |
राज ठाकरे यांचा पक्षाला उभारी देण्यासाठी निर्णय
सांगली / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतल्याचे समजते. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे आता ॲक्शन मोडवर आले आहेत. पक्षातील निष्क्रिय पदाधकार्यांकडे त्यांनी मोर्चा वळविला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून बाकी आहेत. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये मनसेची निर्णायक ताकद आहे. पण संघटनात्मक तक्रारी सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर यामध्ये अधिकच भर पडली आहे. त्यामुळे ठाकरे यांनी पक्षांतर्गत बदलांकडे लक्ष दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मनसेच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचं निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
