
सांगलीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी अभिवादन करताना संभाजीराव भिडे (गुरुजी), माजी आमदार नितीन शिंदे, प्रसाद रिसवडे, अनिल शेटे आदी.
संभाजीराव भिडे (गुरुजी);सांगलीत जयंती दिनी अभिवादन
सांगली / प्रतिनिधी
स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचा धगधगता निखारा होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर भगवा झेंडा, देश आणि धर्म यासाठी जी तळमळ पाहिजे ती फक्त बाळासाहेबांच्यामध्ये होती. त्यांच्या सारख्या नेत्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. सांगलीत स्व. ठाकरे यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते. येथील टिंबर एरिया परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भिडे गुरुजी व माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते स्व. बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
माजी आमदार शिंदे म्हणाले, बाळासाहेबांसारखा हिंदूहृदयसम्राट होणे नाही. बाळासाहेब म्हणजे ज्वलंत हिंदुत्व होते. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यावेळी प्रसाद रिसवडे, अनिल शेटे, मनोज साळुंखे, नितीन कोरे, गजानन मोरे, संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, रवींद्र वादवणे, अरुण वाघमोडे, प्रदीप निकम, शांताराम शिंदे उपस्थित होते.