yuva MAharashtra बीडचा 'आका' अब्जावधींचा 'धनी'

बीडचा 'आका' अब्जावधींचा 'धनी'

सांगली टाईम्स
By -

सांगली / प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगच सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर सातत्याने चर्चेत असलेला आणि दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील संशयित 'आका' उर्फ वाल्मीक कराड हा अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचा 'धनी' असल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया त्याच्या संपत्तीचा सातत्याने पर्दाफाश करत आहेत. दरम्यान वाल्मीकच्या संपत्तीची यादी पाहता त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत नेमके कोणते असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
सरपंच देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्मीक कराड चर्चेत आला. वाल्मीक अण्णा शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही असे भर कार्यक्रमात विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटले होते. त्यामुळे वाल्मीक कराड याचे मंत्री मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत हे लपून राहिलेले नाही. या प्रकरणात मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी सातत्याने होत आहे. मात्र गेंड्याची कातडी असलेल्या सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचेच काम आतापर्यंत केले आहे. 
वाल्मीक कराडची संपत्ती
केज, परळी व बीड मध्ये - ४ ते ५ वाईन शॉप
बीड - ५० एकर जमीन
बार्शी - ४५ एकर जमीन 
सोनपेठ - ५० एकर जमीन
दिघोळ (जामखेड) - १५-२० एकर जमीन
सिमरी पारगाव -१५-२० एकर जमीन
सिमरी पारगाव -१०-१२ एकर जमीन
सिमरी पारगाव ५० एकर जमीन
शेंद्री (बार्शी) - ५० एकर जमीन
हडपसर - २ बीएचके फ्लॅट
पुणे (मगरपट्टा) - ७५ कोटींची मालमत्ता
पुणे - ३५ कोटींचे ऑफिस
पिंपरी चिंचवड - २ बीएचके फ्लॅट
पिंपरी चिंचवड - ४ बीएचके फ्लॅट
दरम्यान वाल्मीक कराडवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कराड बाबत रोज नव नवे खुलासे समोर येत आहेत. आता त्याच्या संपत्ती बाबत महत्वाचे खुलासे समोर आले आहेत. कराड हा अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचा 'धनी' असल्याचे समोर आले आहे. कराडच्या संपत्तीची यादी पाहता त्याचा नेमका उद्योग काय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.