
सांगलीत भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी माजी आदर नितीन शिंदे. बाजूस अविनाश मोहिते व अन्य.

माजी आमदार नितीन शिंदे; तरुणांना पक्षात काम करण्याची मोठी संधी
सांगली / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षात तरुणांना काम करण्याची मोठी संधी आहे. या पक्षाचे सदस्य व्हा. पक्ष मजबूत करा असे आवाहन माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले. येथील मारुती चौक मध्ये भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या वतीने अविनाश मोहिते आणि उदय मुळे यांच्या पुढाकाराने भाजपा सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याचा शुभारंभ माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. रविवार पासून राज्यभरात पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी देणारा कोणता पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. तरुणांनी राजकारणात आले पाहिजे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पक्षाचे सदस्य व्हावे. पक्ष संघटन मजबूत करावे.
भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले, भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल याकडे लक्ष द्यावे. कामगार मोर्चा उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील एक लाख बूथवर सध्या भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांचे नेतृत्वाखाली सांगली विधानसभा मतदारसंघात आज सर्व बुथवर मोठ्या प्रमाणात सदस्यता नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. याचा फायदा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत होणार असून त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, बिर्जे, हनुमंतराव पवार, सौ. मंजिरी गाडगीळ, सौ.भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, अनिल गडकरी, विजय कडणे, सौ. स्मिता पवार, सौ. माधुरी वसंगडेकर, सौ. रोहिणी उदय मुळे, विजय साळुंखे, विशाल पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, रामचंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.