yuva MAharashtra सांगलीत २७ पासून स्व. मदनभाऊ पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

सांगलीत २७ पासून स्व. मदनभाऊ पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

सांगली टाईम्स
By -

रोख १ लाखांचे बक्षीस; महापालिकेकडून तयारी सुरू

सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मानाची असलेली स्व. मदनभाऊ पाटील राज्यस्तरीय महाकरंडक एकांकिका स्पर्धा यावर्षी सोमवार २७ जानेवारी ते बुधवार २९ जानेवारी अखेर आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या एकांकिकेसाठी रोख एक लाख रुपये व करंडक बक्षीस देण्यात येणार आहे. सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.
"मराठीची नाटयपंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या शहरातही महत्वपूर्ण स्पर्धा कोरोनाबी दोन वर्षे वगळता सलग ५ वर्षी ही घेतली जात आहे. महाराष्ट्राची समृध्द नाटयपरंपरा पुढे नेण्यासाठी पालिकेचा हा छोटासा प्रयत्न आहे. मला या गोष्टीचा व्यकिशः आनंद वाटतो."

शुभम गुप्ता आयुक्त, मनपा.
महापालिकेतर्फे स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून राजेंद्र पोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्व. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापालिकेतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय एकांकिका महाकरंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोरोना काळात यामध्ये खंड पडला होता. गत दोन वर्षे या स्पर्धा मिरज येथील महापालिकेच्या बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे स्पर्धा होणार आहेत. सोमवार २७ जानेवारी ते बुधवार २९ जानेवारी या तीन दिवसांच्या काळात स्पर्धा होतील. 
विजेत्या एकांकिकेसाठी १ लाख रुपये रोख व करंडक असे बक्षीस आहे. उपविजेत्या एकांकिकेसाठी बक्षीस आहे. एकूण २ लाख ४८ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी योग्य नियोजन व तयारी करण्याचे आदेश गुप्ता यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना सादरीकरण, राहण्याची व इतर सोय उत्तमरीतीने करण्यात येणार आहे. 

Tags: