yuva MAharashtra धनंजय मुंडेना सरकार संरक्षण का देतय?

धनंजय मुंडेना सरकार संरक्षण का देतय?

सांगली टाईम्स
By -

 
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती; राज्यपालांनाभेटणार;राजीनामा दिला पाहिजे

सांगली / प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात असलेले संशयित आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. वाल्मिकी कराड तर त्यांचा विश्वासू माणूस आहे. याची जबाबदारी स्वीकारत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र सरकारच त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप माझी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
दरम्यान याबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मेसाजोगचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास म्हणावा तसा होताना दिसत नाही. खंडणी प्रकरणातील वाल्मिकी कराड व हत्या प्रकरणातील आरोपींचे कनेक्शन आहे. कराड मंत्री मुंडे यांचा विश्वासू माणूस आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनीही एका सभेत वाल्मिकी कराड शिवाय मंत्री मुंडे यांचे पानही हलत नसल्याचे म्हंटले आहे.
तरीही सरकार शांत आहे. मंत्री मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अश्या भावना आहेत. तरीही सरकार मुंडे यांना का पाठीशी घालतय असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, ही कोण्या जातीची नव्हे तर माणुसकीची हत्या आहे. मंत्री मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी मंत्री मुंडे यांच्या सबंधित आहेत. यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटणार आहोत असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.