yuva MAharashtra मिरजेत 'द टेबल टॉक कॅफे'त अश्लील चाळे

मिरजेत 'द टेबल टॉक कॅफे'त अश्लील चाळे

सांगली टाईम्स
By -

 

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप
कॅफे बेकायदेशीर; कारवाई न झाल्यास आंदोलन 

मिरज / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रात पुन्हा बेकायदेशीर कॅफे चालकांनी बस्तान बसविले आहे. मिरज मधील  'द टेबल टॉक कॅफे'त अश्लील चाळे चालत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केला. कॅफेत बेकायदेशीर पणे कंपार्टमेंट करण्यात आले आहेत. कॅफेवर पोलिसांनी तातडीने करवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली. अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

 कॅफेत अल्पवयीन मुलींना प्रवेश

कॅफेत अल्पवयीन मुलींना प्रवेश दिला जात असल्याचे सांगत कॅफे बंद करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी केली. मिरज पोलिसांनी तातडीने धाव घेत कॅफे शॉपची पाहणी केली. ज्यामध्ये कॅफे शॉप मध्ये पारदर्शकता आणि सीसीटीव्ही असणं आवश्यक असताना,या ठिकाणी सर्व नियमांचे उल्लंघन सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कॅफेवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा रणजित चव्हाण यांनी दिला आहे. 

सांगलीसह मिरज शहरामध्ये अनधिकृत कॅफेंचे पेव फुटले आहे. काही महिन्यांपूर्वीच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रणजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगलीतील कॅफेंची तोडफोड केली होती. त्यांनतर महापालिका, पोलिसांनी कॅफेंची पाहणी करत कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र कारवाई शिथिल होताच अनधिकृत कॅफेनी पुन्हा डोके वर काढले आहे. रविवारी मिरजेत द टेबल टॉक कॅफे'त अश्लील चाळे सुरु असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून आंदोलन करण्यात आले.






 
Tags: