मुंबई / प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून सन २०२५ हे वर्ष 'श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष' म्हणून साजरे करण्यात होणार आहे.
युवा नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वात राज्यातील ३६ जिल्ह्यात विविध अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विविध उपक्रम पुढीलप्रमाणे -
- राज्यातील ६०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी वर्गास ई-प्रणाली द्वारे अध्यात्मिक व पारंपारीक शिक्षण मिळणार. १००० कीर्तनकरांचा समावेश असणार.
- राज्यभर तालुका, जिल्हा, विभाग निहाय श्रीएकनाथ भजन स्पर्धेचे आयोजन.
- अध्यात्मिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून शिवसेनेचे एक लक्ष सभासद सहभागी होणार.
- श्री एकनाथ अध्यात्मिक संवाद महाराष्ट्र दौरा.
- शिवसेना अध्यात्मिक सेनेच्या धर्मवीर मुखपत्राची निर्मिती.
- ग्रामीण भागातील आवश्यक असणाऱ्यांना भजन मंडळास संत साहित्य भेट.
- राज्यातील ६००० मंदिरात वर्षभर प्रत्येक महिन्याला कीर्तनातून शासकीय योजना व एकनाथ शिंदेच्या अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याचा प्रसार.
- राज्यभर विभागीय अध्यात्मिक अधिवेशने.
- भव्य श्रीराम कथांचे आयोजन.
- अध्यात्मिक क्षेत्रातील समस्या निवारणासाठी हेल्पलाईन निर्मिती.
