yuva MAharashtra सलग १५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन

सलग १५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन

सांगली टाईम्स
By -


तासगाव मधील युवा ग्रुप मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम

तासगाव / प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून (गुरुवार पेठ) तासगाव येथील युवा ग्रुप मित्रपरिवार, जियोलाईफ फौंडेशन आणि ॲग्रीमार्ट तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे यंदाचे १५ वे वर्ष होते.

सामाजिक उपक्रमद्ये अग्रभागी असलेल्या या ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न चुकता दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या शिबिरात ७४ बाटल्यांचे संकलन करून रक्तदात्यांनी आपले सामाजिक कर्तव्य बजावले.

या शिबिरास तासगाव पालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे,आमदार रोहित पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी रक्तदात्याना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचें अध्यक्ष किरण कुंभार,व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी,जियो लाईफ फॉउंडेशनचें किरण थोरात, ॲग्री मार्टचे राहुल मोरे यांनी परिश्रम घेतले.

Tags: