yuva MAharashtra जेवणाच्या वादातून परप्रांतीय मजुराची हत्या!

जेवणाच्या वादातून परप्रांतीय मजुराची हत्या!

सांगली टाईम्स
By -


कुपवाड एमआयडीसी मधील घटना; संशयित पोलिसात हजर

सांगली / प्रतिनिधी

जेवण खराब बनवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा बळी गेल्याची घटना कुपवाड एमआयडीसी मध्ये घडली. भांडणादरम्यान दोघांनी आपल्या मित्रावर लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याची जागीच हत्या केली. इद्रिस गौरीशंकर यादव (वय २३, उत्तर प्रदेश, शाहूपुरी) असे मृताचे नाव आहे.  तर वैभव कांबळे (वय २१) व संतोष खोत (वय २२ दोघेही मूळ रा. सलगरे) यांना अटक करणेत आली आहे. 

हे सर्वजण कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या खोलीत एकत्र राहत होते. काल रात्री त्यांच्यात जेवणावरून वादात मित्रावर हल्ला करत त्याला जबर मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी घाबरून गेले.

आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत.सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक प्रणिल गिलडा यांच्या सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी  दाखल झाले होते.

Tags: