कार्यकर्त्यांनी झळकाविले पोस्टर ; नेत्याप्रती व्यक्त केली भावना
सांगली / प्रतिनिधी
भाजपचे जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर सद्या भलतेच चर्चेत आहेत. एखाद्याला थेट अंगावर घेण्याची धमक, आक्रमकपणा, सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ यामुळे आमदार पडळकर सद्या तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या लोकनेत्या बाबत तरुण त्यांच्या प्रती विविध माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करीत असतात. असेच प्रकार जम्मू - काश्मिरच्या खोऱ्यात पहायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी चक्क काश्मीर खोऱ्यात चक्क गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर झळकावले. याचे फोटो समजमध्यामावर चांगलेच व्हायरल होते आहेत.
गणेश वडितके( रा. गळनिंब, ता. श्रीरामपुर ) गजानन नगरकर (रा. खंडाळा ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) अशी या दोन गोपी समर्थकांची नावे आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी क्रेझ आहे. एक आक्रमक आणि सर्वसामान्यांच्या हाकेला तत्काळ धावून येणारा नेता म्हणून आमदार पडळकर यांची ओळख आहे. प्रचंड विरोध असतानाही त्यांनी केवळ जनतेच्या प्रेमाच्या जोरावर नुकताच जत विधानसभा मतदार संघातून मोठा विजय मिळविला. टीम देवेंद्र मधील विश्वासू नेता म्हणून ही त्यांना ओळखले जाते.
"एकच छंद ....गोपिचंद ही घोषणा राज्यात अनेक ठिकाणच्या समर्थकाच्या तोंडी असते. मग ते आंदोलन असो कि सत्कार की अन्य कार्यक्रम त्या ठिकाणी एकच छंद, गोपिचंद हा आवाज कानी पडतोच. आमदार गोपिचंद पडळकर हे अस रसायन आहे ते भेटणाऱ्या प्रत्येकाला डोक्यात ठेवतातच,आपल्या कार्यकर्त्यांवर मनापासून जीव लावतात. सुख दु:खात साथ देतात. काम कोणतेही असो. त्या ठिकाणी फोन जातोच. गरजच असेल त्याठिकाणी प्रत्येक्ष हजर राहून अडचण सोडविली जाते. याच विश्वासाच्या जोरवर गोपी सैनिक आपल्या नेतृत्वाला जपतो. स्वाभिमान जागृत करणारा हा लोकनेता प्रसंगी बापू बिरू वाटेगावकरांच्या भूमिकेत तर तर कधी सदगुरु संत बाळू मामाच्या भूमिकेमध्ये मध्ये असतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणात असा लोकनेता सर्वोच्च उंचीवर गेला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारे समर्थक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत.
धनगर समाजासह अठरा पगड, बारा बलुतेदार समाजामध्ये आमदार पडळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषतः तरुणांमध्ये पडळकर चांगलेच फेमस आहेत. अनेक त्यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारे आहेत. याचा प्रत्यय वारंवार येतो. असाच एक प्रकार जम्मू - काश्मीर मध्ये पाहायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी चक्क काश्मीर खोऱ्यात आमदार पडळकर यांचे पोस्टर झळकावले. 'एकच छंद, गोपीचंद' अशी घोषणा देत काश्मीर खोरे दणाणून सोडले. गणेश वडितके( रा. गळनिंब, ता. श्रीरामपुर ) गजानन नगरकर (रा. खंडाळा ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) अशी या दोन गोपी समर्थकांची नावे आहेत. याचे फोटो समजमद्यामावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
