सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित
सांगली / प्रतिनिधी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन संशयित अजूनही फरार आहेत. पोलिसांनी तीनही संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या संशयितांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. याशिवाय बक्षीसही दिले जाईल असे आवाहन केज (जि. बीड) पोलिसांनी केले आहे.
सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा शामराव आंधळे (वय ३०, रा. मैदवाडी, ता. धारूर) व सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. केज) अशी फरार संशयितांची नावे आहेत. सरपंच देशमुख यांचा खून झाल्यापासून ते फरार आहेत. बीड पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पण ते सापडत नसल्याने पोलिसांनी आता त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
![]() |
| माहिती देणाऱ्याने या अधिकाऱ्यांशी करावा संपर्क |

