सांगली / प्रतिनिधी
येथील कै. रामचंद्र शंकर रुपनर व गोकुळा रामचंद्र रुपनर यांच्या स्मरणार्थ दर्ष आमावस्या निमित्त बुधवार दि. २९ रोजी सांगलीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डी युवा शक्तीचे संस्थापक, अध्यक्ष विनायक रुपनर यांनी केले आहे.
बुधवारी दर्श आमावश्या आहे. यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संजयनगर येथील विनायक रुपनर यांच्या संपर्क कर्यालयासमोर सायंकाळी ७ वाजता महाआरती व त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांसह भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डी युवा शक्ती संघटनेकडून करण्यात आले आहे.
