कवठेमहंकाळ/ सतीश पाटील
अलकुड एम (ता.कवठेमहंकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत व शाळेच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी फनीगेम्स, खेळ पैठणीचा, पाककला स्पर्धा, लिंबु चमचा, पासिंग बाॅल स्पर्धा, बादलीत चेंडू टाकणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन शिरढोणच्या केंद्रप्रमुख गवळी मॅडम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर पाटील व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी माणिकभाऊ यांचे योगदान लाभले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिपक कांबळे यांनी तर सुत्रसंचालन मनिषा शिंदे यांनी केले. राधिका खोत यांनी आभार मानले.
.jpg)