yuva MAharashtra विनायक सिहांसने यांचे काम कौतुकास्पद

विनायक सिहांसने यांचे काम कौतुकास्पद

सांगली टाईम्स
By -
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करताना भाजपचे माजी सभागृह नेते विनायक सिहांसने. बाजूस सुधीर सिहांसने, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी आदी.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ; संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सांगली / प्रतिनिधी

लिंगायत समाजाचा कार्यकर्ता, नगरसेवक ते सभागृह नेता अशी  वाटचाल असलेल्या विनायक सिहांसने यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे, असे मत राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

मंत्री पाटील यांच्या हस्ते सिहांसने यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपचा नगरसेवक म्हणून सिहांसने यांनी प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. सभागृह नेता असताना पक्षाच्या नगरसेवकांची चांगली मोट बांधली. सभागृहात विविध विषयांना वाचा फोडली. पाच वर्षे निष्ठावंत नगरसेवक म्हणून काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. 

यावेळी माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, सुधीर सिंहासने, शशिकांत टेके, धनेश कातगडे, चंद्रकांत घुणके, किशोर चंदूरे सर, डॉक्टर गणेश सिंहासने, दीपक पवार,नंदू पाटील, उमेश परनाकर, प्रमोद बुकटे, अजित चव्हाण,प्रदीप गावडे, राजू वायदंडे, श्रीशैल्य कवळी, अमोल भोसले, विशाल तांदळे, देवेंद्र पाटणकर, प्रकाश मुळगुंद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: