yuva MAharashtra विठ्ठल चव्हाण तासगावच्या पत्रकारितेतील भीष्माचार्य !

विठ्ठल चव्हाण तासगावच्या पत्रकारितेतील भीष्माचार्य !

सांगली टाईम्स
By -

ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांचा सत्कार करताना तासगाव नागरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील. बाजूस तासगाव तालुका शामिक पत्रकार संघाचे पदाधिकारी. 

मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील; तासगावमध्ये सत्कार
तासगाव / राजाराम गुरव
तासगाव शहरासह तालुक्याच्या विकासामध्ये विठ्ठल चव्हाण यांचा सिंहांचा वाटा आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. न डगमगता त्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या लेखणीमुळे अनेकांच्या राजकीय व सामाजिक चढउतार दिसून आले. खऱ्या अर्थाने तासगावच्या पत्रकारितेतील ते भीष्माचार्य आहेत. त्यांची लेखणी कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले.
तासगाव तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल चव्हाण यांना क्रांतीवीर वड्डे ओबाना समाज गौरव पुरस्कार मिळालेबद्दल तासगाव येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचेहस्ते शाल, फेटा, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील‌ म्हणाले चव्हाण यांच्या  लेखणीमुळे अनेकांच्या जिवनात राजकीय, सामाजिक चढउतार दिसून आले. पत्रकारीतेमध्ये चव्हाण याना अनेक पुरस्कार मिळालेबद्दल कौतुक केले. 

सत्कारमुर्ती विठ्ठल चव्हाण म्हणाले या सत्कारामुळे  व सहकारी पत्रकार बांधव यांचेमुळे मला उर्जा मिळाली. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार संघाचे उपाध्यक्ष विलास जमदाडे यांनी केला. के.टी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाचे सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव राजाराम यांनी तर स्वागत व प्रास्ताविक विलास साळुंखे सर यानी केले. प्राध्यापक हजारे सर यांनी आभार मानले.
Tags: