![]() |
| खासगीकरण, स्मार्ट मीटर विरोधात सांगली येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करताना वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी व वीज कर्मचारी. |
वीज कर्मचाऱ्यांचा आरोप; सांगलीत तीव्र निदर्शने; शिवसेना (उबाठा गट) ही आंदोलनात
सांगली / प्रतिनिधी
उपकेंद्राच्या खासगीकरणासह स्मार्ट मीटरबाबतचा निर्णय रद्द करु. ते फक्त शासकिय कार्यालयामध्ये बसविण्यात येतील अशी ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. परंतू आता छूप्या पध्दतीने या निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी शब्द फिरविल्याचा आरोप करत गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्याऱ्यांनी विश्रामबाग येथील अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
या आंदोलनानंतरही शासनाने खासगीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशारा वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस कॉ. महेश जोतराव यांनी दिला. दरम्यान यावेळी आंदोलक कर्मचाऱ्याऱ्यांनी शासन आणि महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आदोलनास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पाठींबा दिला शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणावर त्यांनी आसूड ओढले महावितरणने ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे कामही अदानी एनर्जी सोल्युशन या कंपनीला देण्यात आले आहे.
शासनासह उर्जा मंत्रालयाच्या या निर्णयामुळे बीज कर्मचाऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वास्तविक निवडणुकीपूर्वीच महावितरणने हा निर्णय घेतला होता पंरतु कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द करु अशी ग्वाही दिली होती मात्र पुन्हा खासगीकरणाचा घाट घातल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विश्रामबाग येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
शासनासह महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान कर्मचा-यांच्या विरोधानंतरही शासनाने हा निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशारा कर्मचाऱ्याऱ्यांनी दिला. यावेळी वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस कॉ. महेश जोतराव उपसरचिटणीस श्रीमंत खरमाटे विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे, सुरेश पाटील, सचिव प्रमोद पोतदार जगदीश नलवडे, राजेंद्र पाटील सचिन पाटील किरण तारळेकर जयसिंग जगताप, दत्ता पाटील यांच्यासह १५०हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.
