yuva MAharashtra नागेश कारंडे २१ किमी मॅरेथॉनचा विजेता

नागेश कारंडे २१ किमी मॅरेथॉनचा विजेता

सांगली टाईम्स
By -


महिलांमध्ये स्नेहल खरात अव्वल ; स्पर्धेत हजारो नागरिकांचा सहभाग

सांगली / प्रतिनिधी

राधेय सेवा फौंडेशनतर्फे आयोजित आणि 'पीएनजी' सराफ व ज्वेलर्स पुरस्कृत तिसऱ्या सांगली मॅरेथॉन स्पर्धेत २१ किमीमध्ये नागेश कारंडे याने, तर १० किमी महिलांमध्ये स्नेहल खरात यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेला नागरिकांननी उत्स्फूर्त प्रतिसाद मिला. सकाळच्या बोचऱ्या थंडीतही हजारो धावपटूंनी धाव पूर्ण करत जल्लोष केला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत धावपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 

आमदार सत्यजित देशमुख, 'पीएनजी'चे राजीव गाडगीळ, रोटरीचे किशोर लुल्ला, सेवासदन हॉस्पिटलचे डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. सुरेश वाघ, टीजेएसबी बँकचे चिंतामणी जोशी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, दिगंबर जगताप. ॲड. प्रकाश लोखंडे यांच्याहस्ते वेगवेगळ्या गटातील स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेची सुरुवात नेमिनाथनगर येथून झाली. त्यानंतर मार्केट यार्ड-कर्मवीर चौक-राम मंदिर चौक-राजवाडा चौक-गणपती मंदिर-टिळक चौक-कसबे डिग्रज फाटा व परत नेमिनाथनगर क्रीडांगण असा मार्ग होता. 

स्पर्धेचा निकाल असा ३ किमी १६ वर्षे मुली तनुजा सोलनकर, अनुष्का शिंदे, सफा सय्यद, तनिष्का देशिंगे, अंबिका माळी, श्रद्धा गुंटुक. १६ वर्षे मुले तुषार माने, वेदांत होसूरकर, सागर शर्मा, सुमित माने, साईश्वर गुंटुक, चेतन भारमल. १० किमी पुरुष अभिनंदन सूर्यवंशी, प्रथमेश पाटील, वैभव पवार, सुशांत सरगर, सुनील सरगर, अभिजित हजारे. १० किमी महिला महिला स्नेहल खरात, साक्षी कुसुळे, प्रियांका कदम, शुभांगी पाटील, माधुरी कदम, प्रीती नाईक, प्रिया पंडित. २१ किमी पुरुष नागेश कारंडे, प्रकाश अदलगी, राहुल शिरसाट, अनिकेत साळुंखे, अनिकेत गर्ग, सुशिल कुमार.