yuva MAharashtra आत्ताची लढाई विचार, लेखणी आणि तत्वज्ञानाची

आत्ताची लढाई विचार, लेखणी आणि तत्वज्ञानाची

सांगली टाईम्स
By -

 

सांगली :  विजयस्तंभाला अभिवादन करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते. 

प्रा. गौतमीपुत्र कांबळे; सांगलीत भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त निमित्त अभिवादन

सांगली : प्रतिनिधी 
भीमा कोरेगावची लढाई तलवारीची होती. आताची खरी लढाई विचार , लेखणी आणि तत्त्वज्ञानाची आहे आणि ही लढाई आपण शंभर टक्के जिंकू शकतो असे मत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले. सांगलीतील मातारमाई आंबेडकर उद्यान व संरक्षण समिती यांच्यातर्फे भीमा कोरेगाव २०७ शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव क्रांती स्तंभाचे भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 
यावेळी गौतमीपुत्र कांबळे सह विविध राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक सी. आर. सांगलीकर होते. यावेळी बोलताना गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, भारताच्या इतिहासाला योग्य दिशेने कलाटणी घेणारा हा दिवस आहे. त्या दिवशी काय झाले, तर पेशवाई विरुद्ध इंग्रज ज्यांची लढाई झाली. या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने महार बटालियन जीवाची बाजू लावून लढली. पेशवाईला पराभूत केले. मानवतेचा पराभव करून मानव मुक्तीचा विजय मिळवून १ जानेवारी या दिवशी डॉ. बाबासाहेबांनी सुद्धा भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना दिली होती. त्या भिमा कोरेगावच्या स्तंभाचे प्रतिकृती सांगली मध्ये उभी झालेले आहे याचे श्रेय माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना आहे, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले. 
यावेळी माता रमाई आंबेडकर उद्यान व संरक्षण समितीच्या अध्यक्ष आशाताई साबळे, जगन्नाथ ठोकळे, प्राध्यापक सुकुमार कांबळे, प्राध्यापक सरला कांबळे, सुरेश दुधगावकर, ऋतुराज पवार, डॉक्टर नितीन गोंधळे, पारमिता धम्म कीर्ती,चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष मनोज गाडे सचिव अविनाश कांबळे संचालक अरुण आठवले, डॉक्टर सुधीर कोलप, भारती भगत, उत्तम कांबळे, हणमंत साबळे, राजेंद्र खरात, छाया सर्वोदय, आधी उपस्थित होते.. यावेळी सी.आर . सांगलीकर म्हणाले. जगाला गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराची खरी गरज आहे असे मत सांगलीकर व्यक्त केले.