yuva MAharashtra सांगलीत नववर्षाचे जल्लोषी स्वागत

सांगलीत नववर्षाचे जल्लोषी स्वागत

सांगली टाईम्स
By -



दारू नको, दूध प्या उपक्रमास तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद

सांगली / प्रतिनिधी 

फटाक्यांची आतिषबाजीसह मोठ्या उत्साहात सांगलीकरानी नव वर्षाचे स्वागत केले. मंगळवारी रात्री बारा वाजता २०२५ या नववर्षाचे सांगलीकरांनी अत्यंत धूमधडाक्यात स्वागत केले. या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात विविध हॉटेल्स, लॉन्स आदींसह अन्य अनेक ठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन केले होते. अनेक सामाजिक संस्थांनी 'थर्टीफर्स्ट'च्या रात्री 'दारु नको, दूध प्या' या उपक्र माचे आयोजन केले होते. त्यालाही सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध हॉटेल्समध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊ केल्या होत्या. एखाद्या उत्सवाप्रमाणे नववर्षाचे स्वागत सांगलीतून झाले. सरत्या वर्षाला निरोप देत आपल्या कुटुंबासमवेत तरुण-तरुणींनी आनंदोत्सव साजरा केला. सर्वत्र न्यू इअर सेलिबे्रशन मूड पहायला मिळाला. पार्टी करत 'हॅप्पी न्यू इअर' म्हणत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षाला निरोप देत अनेकांनी नव्या वर्षाचे स्वागत आनंदात, हषार्ेल्हासात केले. अनेकांनी आप्तेष्टांना, मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांसमवेत नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकासाठी खास ठरली. मध्यरात्री बारा वाजता 'हॅप्पी न्यू इअर' म्हणणाऱ्या तरुणाईचा सर्वत्र जल्लोष दिसून आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले होते. काहींनी मांसाहारी तर काहींनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेत पार्टी 'एन्जॉय' केली.

शहरातील मारुती चौक, दत्त-मारुती रस्ता, हरभट रस्ता, पेठभाग, विश्रामबाग चौक, कॉलेज कॉर्नर आदी ठिकाणी सेलिबे्रशन पहावयास मिळाले. मॉलमध्येही नवीन वर्षाच्या स्वागताचा रंग चढला होता. विद्युत रोषणाईने आणि आकर्षक सजावटीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक सांगलीकरांनी शहराच्या जवळ असलेल्या फार्म हाऊस, मित्र आणि नातेवाईकांकडे जाऊन न्यू इअर पार्टी केल्याचे पहावयास मिळाले. काहींनी घरीच 'हाऊस पार्टी' करत नव्या वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. दुसरीकडे सोसायट्यांमध्येही पार्टीचे आयोजन केले होते.

मावळत्या वर्षाच्या कटू आठवणी सोबत न घेता ठराविक चांगल्या आठवणी घेऊन नव्या वर्षाचे संकल्प आणि आनंद साजरे करुन प्रत्येकाने सेलिब्रेशनचा पुरेपूर आनंद घेतला. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी, प्रमुख मार्गांवर नाकाबंदी केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नवीन वर्षाच्या स्वागताचा जोष रात्री उशिरापर्यंत सुरु होता. एकूणच सांगलीकरांनी न्यू इअरचे स्वागत जल्लोषात आणि उत्साहात केले.

Tags: