गंभीर जखमी ; लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई / प्रतिनिधी
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली. अज्ञाताने त्याच्या घरात घुसून हा हल्ला केला आहे. दरम्यान गंभीर अवस्थेत खानला तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे बॉलिवूड सह महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडचे मोठे प्रस्थ आहे. त्याच्यावर वांद्रे येथील घरामध्ये धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला त्याच्या घरात घुसलेल्या चोराने केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर जखमी झालेल्या सैफला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे.

