yuva MAharashtra श्री लक्ष्य स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

श्री लक्ष्य स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांगली टाईम्स
By -


तासगाव / प्रतिनिधी

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील श्री लक्ष्य अकॅडमी सैनिक पॅटर्न स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, थाय बॉक्सिंग इंडिया फेडरेशन चेअरमन पी. वाय. आत्तार, चंद्रकांतदादा चव्हाण, सुनीता पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनामध्ये भारतीय संस्कृती जपणारा असा विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहायला मिळाला. यामध्ये मराठी हिंदी गीत, देशभक्ती नृत्य , शेतकरी थीम, महाराष्ट्रीय लोकगीत, लावणी अशा अनेक गीतांचा यामध्ये समावेश होता. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते युगपुरुष स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक रुपाली लांडगे यांनी स्कूलचा आढावा मांडला. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, नातेवाईक, गावकरी असे चार ते पाच हजार जण उपस्थित होते. शहीद जवान काकासाहेब पावणे यांना समर्पित देशभक्ती आर्मी थीम, तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवनपट आधारीत थीम हे या कार्यक्रमाचे लक्षवेधी गीत ठरले.

श्री लक्ष्य स्कूलच्या प्रांगणामध्ये जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी उभे राहून आपल्या भावना व्यक्त करत धर्मवीर संभाजी महाराज तसेच देशाचे सैनिक यांना मानवंदना दिल्या. संपूर्ण श्री लक्ष स्कूल धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमुन गेले होते. 
श्री लक्ष्य मध्ये देशाचे आदर्श नागरिक घडविला जातो असे प्रतिपादन अविनाश घोरपडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य थाय बॉक्सिंग उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री लक्ष स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळी यांचा सत्कार पालक प्रतिनिधी सुरेश मोटे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक विश्वनाथ गुरव यांनी केले तर सहकारी शिक्षक सचिन पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी क्रीडा शिक्षक सौरभ पाटील यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.