
' इंद्रप्रस्थ 'च्या ३१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील.
यंदा २५१ कोटींचे टार्गेट; दिलीपराव (तात्या) पाटील
सांगली / प्रतिनिधी
स्वच्छ पारदर्शक कारभार, सभासदांच्या हिताचे निर्णय, अत्याधुनिक सेवांच्या माध्यमातून इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात संस्था २५१ कोटींचा व्यवसाय करेल असा ठाम विश्वास संस्थेचे संस्थापक तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव (तात्या) पाटील यांनी व्यक्त केला.
इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील म्हणाले, संस्थेची स्थापना १४ जानेवारी १९९४ रोजी झाली. जिल्ह्यात संस्थेच्या ८ शाखा कार्यरत आहेत. स्वच्छ कारभार करत संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा कारभार सुरू आहे. कार्यक्रमास राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजी पाटील, उद्योजक भावेश शहा, उद्योजक सतीश पाटील, अंबिका पतसंस्थेच्या चेअरमन उषा पंडित, माजी पं.स.सदस्य जयकर पाटील, रोजा किणीकर, भास्कर पाटील यांची भाषणे झाली.
माजी उपसभापती नेताजी पाटील, दुध संघाचे संचालक प्रशांत थोरात, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुजित मोरे, राजारामबापू दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील, चंद्रकांत पाटील, प्रियांका कनप-पाटील, जगन्नाथ पाटील, संस्थेचे माजी चेअरमन युवराज सूर्यवंशी, मोहनराव शिंदे, डॉ.प्रवीण पोरवाल, अमोल गुरव, क्रांतीप्रसाद पाटील, दादासो शेळके, सुहास घोरपडे, बी.आर. पाटील, हौसेराव भोसले, सुहास हांडे यांच्यासह सर्व शाखांचे शाखा सल्लागार, संस्थेचे सभासद, ठेवीदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. संस्थेचे व्हा.चेअरमन अधिक चव्हाण यांनी आभार मानले.