 |
| अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) |
बाळासाहेब किसवे यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना नूतन जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण.
सांगली / प्रतिनिधी
हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ज्वलंत विचारांवर मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेनेच्या ओबीसी, व्हीजेएनटी जिल्हाप्रमुख पदी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम चव्हाण यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे बाळासाहेब भवन येथे राज्याचे मृद् व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड, शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी मंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
 |
| (Add.) |
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू. जिल्हाभरात ओबीसी, व्हीजेएनटीचे संघटन मजबूत करू, असा ठाम विश्वास यावेळी नूतन जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील संघटन वाढ, व्हीजेएनटी, ओबीसींचे विविध प्रश्न, योजना तळागाळातील प्रत्येक समाज घटकांपर्यंत पोहचवा अश्या सूचना यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी दिल्या. यावेळी राज्य समन्वयक मारोती जानकर, सोशल मिडीया प्रसिद्धी प्रमुख तथा धुळे जिल्हाप्रमुख संजय कुसळकर, नांदेडचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील - धमने, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.