
परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक
आजपासून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान
मुंबई / प्रतिनिधी
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सेनेच्या मंत्र्यांकडूनही आपआपल्या खात्यामध्ये लोकोपयोगी अभियान राबविण्यात येत आहेत.
आजपासून एसटीच्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक' अभियान राबवण्यात येणार आहे. स्वच्छ बसस्थानकास तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे.
या अभियानांतर्गत तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून 'अ' वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या वतीने आज विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे.