yuva MAharashtra निमणीच्या विकास सोसायटीला दणका

निमणीच्या विकास सोसायटीला दणका

सांगली टाईम्स
By -

तासगाव : निमणी येथील जय हनुमान विकास सोसायटीचे बांधकाम थांबविण्याबाबत तहसीलदार यांनी स्थगिती आदेश बजावला.

बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल कारवाईची नोटीस

तासगाव / प्रतिनिधी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या जगन्नाथ मस्के व बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ मस्के हे अध्यक्ष असलेल्या निमणी येथील जय हनुमान विकास सोसायटीने गोदाम बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याबाबत तहसीलदार यांनी आदेश देऊनही बांधकाम करणे न थांबविल्याने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी बांधकामावर नोटीस बजावली.

तहसीलदार यांनी दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी आवश्यक ते परवाने घेऊनच बांधकाम करणेबाबत संस्थेला आदेश केला होता. संस्थेने सदरची जागाने हरूनगर गावठाण हद्दीपासून पाचशे मीटरच्या आत आहे, असे भासवून महसूल अधिनियम ४२ ड अन्वये वाणिज्य बिनशेती अशी ७/१२ उताऱ्यावर नोंद करून घेतली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. लगतच्या शेतकऱ्यांच्या हद्दीपासून नियमाप्रमाणे जागा सोडलेली नाही, यासंदर्भात लगतचे शेतकरी रावसाहेब रामचंद्र पाटील यांनीही तक्रार दाखल केली होती. ही बाब त्यांनी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर तहसीलदार यांनी ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिसपाटील व पंचासमक्ष पंचनामा करून नोटीस चिकटविण्यासाठीचे आदेश दिले होते.