yuva MAharashtra तासगावात पत्रकार दिन उत्साहात

तासगावात पत्रकार दिन उत्साहात

सांगली टाईम्स
By -

तासगाव येथे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दीन साजरा करताना पत्रकार, छायाचित्रकार आदी.
ज्येष्ठ दिवंगत पत्रकार आण्णा कोरे, छायाचित्रकार राम बलगे यांना श्रद्धांजली

तासगाव / प्रतिनिधी

येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील ( माजी सरपंच लिंब ) यांचे हस्ते बाळ शात्री जांभेकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 यावेळी नागेवाडी यशवंत शुगर चे कार्यकारी संचालक आर डी पाटील, तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील, सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रदीप पाटील, गलाई व्यवसायिक संपत पाटील ( शेठ) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जेष्ठ पत्रकार आण्णा कोरे ( सांगली ) व फोटोग्राफर राम बलगे (तासगाव) याना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.आर,डी पाटील , महादेव पाटील , प्रदीप माने, कृष्णा पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. 

स्वागत संघटनेचे सचिव राजू गुरव यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.पाहुण्याच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात येऊन ओळखपत्र वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन मधुकर काळबागे सर यांनी केले तर आभार प्रा, डॉ विलास साळूखे यांनी मानले. समारंभास संघाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण , विलास जमदाडे , किरण निकम,  संजय कुमार चव्हाण , अधिकराव हजारे, गणेश भोसले, प्रशांत कुलकर्णी , निलेश साळूखे  याच्या सह पत्रकार उपस्थित होते.

Tags: