![]() |
| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या बैठकीत सूचना
मुंबई / प्रतिनिधी
नागरिकांना आवश्यक सेवा सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आपले सरकार पोर्टलद्वारे सद्या ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात असून त्यांना सेवांचा व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे, यादृष्टीने ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सेवा हक्क आयोगाच्या बैठकीत दिल्या.
राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यपद्धती बाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार , वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी , राज्यातील सर्व राज्य सेवा हक्क आयुक्त आणि संबंधित उपस्थित होते.
