yuva MAharashtra शास्त्रीय संगीतकार पंडित हेमंत पेंडसे उद्या सांगलीत

शास्त्रीय संगीतकार पंडित हेमंत पेंडसे उद्या सांगलीत

सांगली टाईम्स
By -

 

पंडित हेमंत पेंडसे

गुरुकुल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

सांगली / प्रतिनिधी

प्रसिद्ध शास्त्रीय गायक संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य व शास्त्रीय संगीतकार पंडित हेमंत पेंडसे हे  दिनांक २६ जानेवारी रोजी सांगलीत येत आहेत. येथील गुरुकुल संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांशी ते सांगीतिक चर्चा करणार आहेत. सायंकाळी साडे सहा ते साडे सात वाजण्याच्या दरम्यान हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 

सांगलीत संगीताचार्य द वि काणे बुवा प्रतिष्ठान संचलित गुरुकुल संगीत विद्यालय आहे. अनेक विद्यार्थी या विद्यालयात संगीताचे धडे गिरवत आहेत. दरम्यान प्रथमतः भुसावळ मध्ये पंडित हेमंत पेंडसे यांनी  संगीत शिक्षण दिवंगत श्री. मनोहर बेटावदकर यांच्याकडे घेतले १९७८ नंतर त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पं.अभिषेकी यांच्याकडे इतर घराण्यांतील जे काही चांगले आहे ते आत्मसात करण्याचा दुर्मिळ गुण होता.

त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शिष्यांना चांगल्या संगीताबद्दल खरे प्रेम मिळवण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या गुरूंची शिकण्याची आणि शिकवण्याची अनोखी शैली त्यांच्या शिष्यांमध्येही होती. तेव्हा अश्या सांगितिक चर्चा सत्राचा चा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व रसिकांनी घ्यावा असे आवाहन गुरुकुलाच्या संचालिका सौ. मंजुषा पाटील यांनी केले आहे. 

Tags: