yuva MAharashtra सांगली, किर्लोस्करवाडी; फडणवीस सरसावले

सांगली, किर्लोस्करवाडी; फडणवीस सरसावले

सांगली टाईम्स
By -

 

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र; स्थानकांच्या विकासासह संपर्क क्रांतीला थांबा देण्याची मागणी
सांगली / प्रतिनिधी
सांगली, किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावरील विविध विकासात्मक कामांबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले आहे. या मध्ये दोन्ही स्थानकावर प्रवाशी सुविधा व संपर्क क्रांती थांबा मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकावर लवकरच प्रलंबित विकासकामे सुरू होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
सांगली हा महाराष्ट्रातील प्रमुख ऊस, हळद आणि द्राक्ष उत्पादक जिल्हा आहे. सांगलीमध्ये ३० साखर कारखाने आणि मोठ्या प्रमाणात फाऊंड्रीज, इंजिनीअरिंग युनिट्स आणि टेक्सटाईल युनिट्स आहेत. यापैकी काही युनिट्सनी "चंद्रयान" मिशनच्या यशात हातभार लावला आहे. सांगली स्थानकावरून अनेक गाड्या जातात आणि सांगली येथे थोडा थांबा आहे. नुकत्याच सांगली स्थानकावरून २ नवीन गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी सांगली आणि किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर पुढील सुविधा द्याव्यात अशी विनंती या पत्रांमध्ये करण्यात आली आहे. 
ADVT.

१. सांगली येथे कोचिंग टर्मिनल, PIT लाईन, पाणी पुरवठा सुविधा.
२. दोन्ही स्टेशनवर रिटायरिंग रूम, क्लोक रूम आणि पार्सल बुकिंग ऑफिस.
३. सांगली स्थानकाच्या पूर्वेकडील दुसरा प्रवेश/निर्गमन
४. सांगली येथे संगणकीकृत आरक्षण सुविधेसह अतिरिक्त तिकीट खिडकी
५. दोन्ही स्थानकांवर चौकशी काउंटर.
६. सांगली स्थानकापासून ५ किमी अंतरावर असलेल्या माधवनगर स्थानकावरील गुड्स टर्मिनलचे स्थलांतर
७. अमृत भारत स्थानक विकास योजनेत किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाचा समावेश.
८. किर्लोस्करवाडी स्थानकावरील अतिरिक्त फलाट
९.   संपर्क क्रांती ला सांगली आणि किर्लोसाकरवाडी या दोन्ही स्थानकावरील थांब्यांना मान्यता देणे.

Tags: