![]() |
| भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी सुजित काटे, माजी नगरसेवक शीतल पाटील आदी. पुढे नोंदणी साठी महिलांनी केलेली गर्दी. |
सांगली / प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानास सांगली शहरासह उपनगरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी या अभियानांतर्गत ९०० सदस्य नोंदणी केली. भाजपा हा सर्व समावेशक, लोकशाही मानणारा पक्ष असून तरुणांनी जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी. भाजपचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन काटे यांनी यावेळी बोलताना केले.
रविवार ५ जानेवारी पासून राज्यात भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. मंत्री, आमदार, खासदार यांचेसह पदाधिकारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. दरम्यान सांगली विधानसभा मतदार संघातील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य नोंदणीसाठी सरसावले आहेत. सांगली शहरात तर प्रत्येक प्रभाग, बूथनिहाय सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.
महापालिकेच्या प्रभाग ११ मध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वृध्द, तरुण युवक, युवतींसह महिलांनी भाजपाचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले. जवळपास ९०० हून अधिक सदस्य नोंदणी झाली. यावेळी काटे यांच्यासह माजी नगरसेवक शितल पाटील, भारत दुधाळ, गिरीष शिंगनापुरकर, अमोल सदाकळे, दिनेश कांबळे, सुशांत काटे, सुशिल काटे यांचेसह अन्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

