सांगली / प्रतिनिधी
वाल्मीक कराडला मोक्का लागताच कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत. परळी शहर बंद करण्यात आले आहे. कराड समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला आहे. आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांचा निषेध सुरू आहे. तर दुसरीकडे कराडला कोर्टात हजर करण्यात आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आका अर्थात वाल्मीक कराडला मोका लावण्याच्या मागणीसाठी काल देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. संताप व्यक्त केला होता. मास्साजोगचे गावकरीही संतापले होते. त्यांनी सरकारला आज १० वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत कराडवर मोकका अंतर्गत कारवाई केली आहे.
दरम्यान कराडवर मोक्का अंतगत कारवाई होताच त्याच्या समर्थकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांचा निषेध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे परळी शहर बंद करण्यात आले आहे.
